WhatsApp कडून न्यू इयर सेलिब्रेशन साठी Special Stickers, Reactions चं गिफ्ट; इथे पहा डिटेल्स
WhatsApp New Year 2025 sticker pack आणि video calling effects आता Android आणि iOS devices वर लेटेस्ट अपडेट वर उपलब्ध करण्यात आले आहेत. WhatsApp,च्या माहितीनुसार, आता युजर्स व्हिडिओ कॉल्स करून या फेस्टिव्ह सीझन मध्ये बॅकग्राऊंडला इफेक्ट्स, फिल्टर्स ठेवू शकणार आहेत. यामध्ये नवी अॅनिमेटेड रिअॅक्शन असणार आहेत. मेसेजला रिअॅक्ट करताना party emojis चा वापर करता येणार आहे. मेसेज पाठवणार्या आणि मेसेज ज्यांना मिळणार आहे त्यांना confetti animation मिळणार आहे.