WhatsApp वापरणार्यांसाठी एका नव्या फीचरचा विचार केला जात आहे. Android युजर्ससाठी या नव्या फीचरचा विचार केला जात असून त्याचा क्लोझर लूक पहायला मिळाला आहे. ज्यामध्ये युजर्स आता चॅट थीम निवडू शकणार आहेत. Feature Tracker च्या दाव्यानुसार, चॅट्ससाठी डिफॉल्ट थीम निवडू शकतील आणि अनेक डिझाइन पर्यायांमधून चॅट बबल करू शकतील. मेटा कंपनीच्या मालकीचं व्हॉट्सअॅप हे जगभर लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप कडून वेळोवेळी युजर्सना अॅप मध्ये नवनवे अनुभव आणि त्याचा वापर सुकर करून देण्यासाठी अपडेट्स केले जातात. आता हा नवा बदल युजर्सना नव्या युजर इंटरफेस मधून डिझाईन्सचे अधिक पर्याय देणार आहे. दरम्यान आता स्टेटस मध्ये mention चा पर्याय देखील युजर्सला मिळू शकतो अशी देखील चर्चा आहे.
WhatsApp च्या फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या माहितीनुसार, आता युजर्सला विविध डिझाईन स्टाईल मधून त्यांच्या आवडीचा पर्याय निवडता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जन मध्ये हा पर्याय दिसू शकतो. WhatsApp beta for Android version 2.24.20.12 मध्ये हा पर्याय दिसला.
व्हॉट्सॲपने नेहमी युजर्सना त्यांची चॅट बॅकग्राउंड बदलण्याचा पर्याय दिला आहे पण टेक्स्ट बबलचे रंग सारखेच राहिले जे इंस्टाग्राम आणि मेसेंजरसारख्या इतर मेटा ॲप्सच्या बाबतीत घडले नाही. पण आता नव्या अपडेट मध्ये चॅट बबल आणि व्हॉलपेपर हा नव्या निवडलेल्या थीम नुसार आपोआप रंग बदलणार आहे. फीचर ट्रॅकरच्या माहितीनुसार, युजर्सना आता पर्याय दिला जाईल ज्यामध्ये ते चॅट बबल पेक्षा वेगळा वॉलपेपरसाठी रंग निवडण्याचा पर्याय निवडू शकतात, ज्यामुळे त्यांना कस्टमायझेशन अधिक चांगले करता येईल.
Android मध्ये त्यासाठी व्हॉट्सअॅप च्या सेटिंग मध्ये वेगवेगळ्या थीम मधून तुमच्या आवडीची थीम निवडण्याचा पर्याय असेल. ती डिफॉल्ट म्हणूनही निवडता येईल. तसेच मॅन्युअली विशिष्ट चॅट साठी देखील ठेवता येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, भविष्यात विशिष्ट चॅटसाठी मॅन्युअल ओव्हरराइड पर्याय देखील असेल जेथे युजर्सना विशिष्ट चॅट बबल आणि वॉलपेपरसाठी नवीन रंग निवडण्याचा एक पर्याय दिला जाईल.
डिफॉल्ट थीम निवडण्याचा पर्याय पहिल्यांदा फीचर ट्रॅकर कडून WhatsApp Beta for Android 2.24.17.19.कडून पहिल्यांदा स्पॉट करण्यात आले होते.
WABetaInfo च्या माहितीनुसार, डिफॉल्ट थीम निवडण्याचा हा पर्याय अजूनही विकसित होत आहे. अद्याप तो बीटा टेस्टरवरही आलेला नाही. सध्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कडून विविध नव्या फीचर्सचा विचार केला जात आहे. त्याची टेस्टिंग होत असते. पण सारेच अपडेट्स प्रत्यक्षात येतातच असेही नाही. आता या फीचर द्वारा युजर्सना त्यांच्या व्हिज्युअल इंटरफेसवर अधिक कंट्रोल देऊन, त्यांना चॅट बबलसाठी त्यांचा आवडता रंग निवडण्याची परवानगी देऊन मेसेजिंग अॅपवरचा त्यांचा अनुभव अधिक सुधारण्याचा WhatsAppचा हेतू आहे.
जाहिरात
जाहिरात