ही कथा मध्य प्रदेशातील तुरुंगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका दुहेरी खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेली महिला आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला जेल गार्ड यांच्यात निर्माण होणारा अनोखा संबंध आणि त्यातून उलगडणारा गुन्हेगारी व नैतिकतेचा गुंता हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.
30 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा जबरदस्त मेळा पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात सितारे जमीन पर, वध 2, भाभीजी घर पर हैं: फन ऑन द रन यांसारख्या चित्रपटांसह मामला लीगल है सीजन 2 आणि इतर अनेक वेब सिरीज रिलीज होत आहेत. Sitaare Zameen Par आणि Vadh 2 सारख्या मोठ्या टायटल्सपासून ते कॉमेडी, थ्रिलर आणि ड्रामा अशा विविध प्रकारच्या कंटेंटमुळे प्रेक्षकांसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. Bhabiji Ghar Par Hain! चा OTT अवतार देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
Rajisha Vijayan अभिनीत Masthishka Maranam हा साय-फाय ड्रामा 27 मार्च 2026 पासून Netflix वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एका दुःखी वडिलांची कथा दाखवली आहे, जो आपल्या मृत मुलाच्या आठवणी पुन्हा अनुभवण्यासाठी व्हर्च्युअल रिअॅलिटीचा वापर करतो. मात्र, या प्रक्रियेत तो एका गूढ आणि धोकादायक जाळ्यात अडकतो. हा चित्रपट सायबरपंक शैली आणि भावनिक कथानक यांचा अनोखा संगम सादर करतो आणि हिंदी, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
या आठवड्यात (23 ते 29 मार्च) OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. मर्दानी 3, ओ रोमिओ, काट्टान आणि डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन सीझन 2 यांसारख्या बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार आणि झी5 सारख्या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे कंटेंट रिलीज होत असून, क्राइम थ्रिलरपासून रोमँटिक ड्रामा आणि सुपरहिरो अॅक्शनपर्यंत सर्व काही या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.
राजकुमार रावचा आगामी ‘टोस्टर’ हा चित्रपट लवकरच Netflix वर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना विनोद आणि थ्रिलचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. सान्या मल्होत्रासह दमदार कलाकारांसह हा चित्रपट मजा, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेला मनोरंजक प्रवास ठरणार आहे.
देशभक्तीपर युद्धपट Border 2 आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून 1971 च्या भारत-पाक युद्धातील शौर्य आणि बलिदानाची कथा प्रेक्षकांसमोर आणतो. सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तीव्र युद्धदृश्यांसह भावनिक मांडणी पाहायला मिळते. यावर्षी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे.
९ ते १५ मार्च २०२६ या आठवड्यात विविध OTT प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. Aspirants Season 3, The Taj Story, Made in Korea आणि Sankalp यांसारख्या बहुप्रतिक्षित रिलीजमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे. कोर्टरूम ड्रामा, रोमँस, कॉमेडी आणि अॅनिमेशन अशा विविध प्रकारचे कंटेंट Netflix, Prime Video, Zee5 आणि JioHotstar सारख्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
२ ते ८ मार्च दरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत. Gandhi Talks, Subedaar, Young Sherlock आणि War Machine यांसारख्या बहुचर्चित शीर्षकांसह प्रेक्षकांना या आठवड्यात अॅक्शन, थ्रिलर, ड्रामा आणि रोमँसचा भरपूर मनोरंजनाचा डोस मिळणार आहे.
Vi ने एका निवेदनात म्हटले आहे की, ही योजना भारतीय कुटुंबांच्या वाढत्या डिजिटल वापराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केली आहे, तसेच वैयक्तिक पसंतींनुसार फायदे कस्टमाइझ करण्याचे स्वातंत्र्य देखील देते.
एकाच पॅक मध्ये आता ग्राहकांना अनेक टीव्ही शोज, ब्लॉकबस्टर सिनेमे, डॉक्युमेंटरीज या Netflix, Jio Hotstar, Zee5, SonyLiv, Lionsgate Play, AHA, Sun Nxt, Hoichoi, ErosNow, आणि ShemarooMe वर पाहता येणार आहेत.
BSNL चा IFTV हा सध्या Android TVs वर काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. म्हणजे आता युजर्सना लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी वेगळ्या सेट अप बॉक्सची गरज नसेल
Jio ने जुलै महिन्यातच आपल्या Jio Prepaid Plans ची किंमत वाढवली होती. फक्त Jio च्या नाही तर इतर दूरसंचार कंपन्यांच्या Prepaid Plans ची सुध्दा किंमत वाढविण्यात आली आहे. पण आता Jio ने पुन्हा त्यांच्या दोन Jio Prepaid Plans ची किंमत वाढवली आहे. असे म्हंटले जात आहे की, या Jio Prepaid Plans मध्ये Netflix ची सदस्यता देखील मोफत मिळत असे. या वाढलेल्या रिचार्जची किंमत जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा