केव्हा होणार खरेदीसाठी उपलब्ध Noise Buds N1 Pro.

Noise Buds N1 Pro फक्त 10 मिनिटे चार्ज केल्यानंतर 200 मिनिटे वापरता येऊ शकतात. यामध्ये असणारी बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर केससह 60 तासांपर्यंत चालू शकते.

केव्हा होणार खरेदीसाठी उपलब्ध Noise Buds N1 Pro.

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • Noise Buds N1 Pro ला स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IPX5 रेटिंग मिळाले आहे.
  • TWS इअरबड्स दोन उपकरणांना जोडण्यास सक्षम आहेत.
  • Noise Buds N1 Pro हे ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटीचे समर्थन करतात.
जाहिरात
Noise ने नुकतेच आपले Noise Buds N1 Pro हे TWS इअरबड्स भारतात लॉन्च केले आहेत. Noise आपल्या बजेट फ्रेंडली इअरबड्स साठी ओळखला जातो आणि आता या इअरबड्सने लॉन्च होताच धुमाकूळ घातला आहे. त्याचे कारण म्हणजे ह्या इअरबड्सला 10 मिनिटे चार्ज केल्यानंतर ती 200 मिनिटे चालतात आणि 60 तास चालणारी बॅटरी अशी अनेक वैशिष्ट्ये. चला तर मग बघुया काय आहेत, या Noise Buds N1 Pro ची किंमत, वैशिष्ट्ये आणि याबाबत बरेच काही. 

Noise Buds N1 Pro ची किंमत आणि उपलब्धता.


बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी Noise Buds N1 Pro हे जरी भारतात लॉन्च झाले असले तरी सुद्धा हे TWS इअरबड्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला अजून वाट पहावी लागणार आहे. अंदाजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी Amazon आणि Noise च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पण नक्की कोणत्या तारखेपासून तुम्ही खरेदी करू शकता याबाबत कंपनीकडून कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही आहे. भारतामध्ये Noise Buds N1 Pro ची किंमत मात्र 1,499 रुपये इतकी असून क्रोम काळा, क्रोम हिरवा, क्रोम खाकी आणि क्रोम जांभळा या रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

Noise Buds N1 Pro ची वैशिष्ट्ये.


Noise Buds N1 Pro यामध्ये 11mm चे ड्रायव्हर्स बसविण्यात आले आहेत. त्यासोबतच ENC म्हणजेच Environmental Noise Cancellation द्वारे समर्थित असल्याने क्वाड माइक सेटअप सुध्दा बसवीण्यात आला आहे. ज्यामुळे आजूबाजूला सुरू असणारा कर्कश किंवा त्रास देणारा आवाज काढून टाकून कॉलिंगचा अनुभव चांगला बनवण्यास मदत मिळते. हे TWS इअरबड्स 32 dB ANC आणि टच कंट्रोल्सचे देखील समर्थन करतात.

Noise Buds N1 Pro मध्ये अल्ट्रा लो लेटन्सी हे वैशिष्ट्य देखील देण्यात आले आहे, जे तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेट वर चालू असलेल्या गेमिंग किंवा व्हिडिओ प्लेबॅक दरम्यान ऑडिओ आणि व्हिज्युअल आउटपुटमधील अंतर वापरकर्त्यांसाठी कमी करण्याचे काम करते. महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे इअरबड्स एकाच वेळी दोघांसोबत जोडले जाऊ शकतात तसेच हायपरसिंक तंत्रज्ञानाचे देखील समर्थन करतात. 

Noise Buds N1 Pro मध्ये ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटी तर देण्यात आलीच आहे, पण यासोबत तुम्हाला एक नवीन वैशिष्ट्य मिळते ते म्हणजे उठा आणि जोडा. याचा फायदा असा होतो की तुम्ही जेव्हा कधीही तुमचे इअरबड्स केसच्या बाहेर काढता ते नजीकच्या उपकरणासोबत कोणत्याही सेटिंग शिवाय जोडले जाऊ शकतात. यामध्ये असणारी बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर केससह 60 तासांपर्यंत चालू शकते. याशिवाय Noise Buds N1 Pro फक्त 10 मिनिटे चार्ज केल्यानंतर 200 मिनिटे वापरता येऊ शकतात. स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी या इअरबड्सला IPX5 रेटिंग देखील मिळाले आहे.
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »