Pixel Buds Pro 2 सोबत Pixel Watch 3 हा गुगलचा पहिला स्मार्टवॉच झाला लॉन्च

Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 हे दोन्ही गॅजेट्स तुम्ही फ्लिपकार्ट या वेबसाइट वर तर Croma आणि Reliance Digital.

Pixel Buds Pro 2 सोबत Pixel Watch 3 हा गुगलचा पहिला स्मार्टवॉच झाला लॉन्च
महत्वाचे मुद्दे
  • Pixel Watch 3 हे 41mm आणि 45mm अशा दोन डिस्प्ले आकारात उपलब्ध.
  • कंपनीचे नवीन स्मार्टवॉच बॅटरी लाइफ सुधारणा देण्यास असक्षम.
  • Pixel Buds Pro 2 हे इयरबड्स अधिक प्रभावी ANC समर्थन ऑफर करते.
जाहिरात
Google ने अलीकडेच स्मार्टवॉचच्या बाजारात प्रवेश केला आहे आणि Pixel Watch 3 हा Google चा पहिला स्मार्ट वॉच असून त्यासोबतच Pixel Buds Pro 2 हे इयरबड्स सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत. चला तर मग बघुयात Google च्या पहिल्या स्मार्टफोनची आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या इयरबड्सची किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहेत. 

Pixel Watch 3 ची किंमत आणि वैशिष्ट्ये

Google ने नुकत्याच लॉन्च केलेल्या त्यांच्या Pixel Watch 3 चे 41mm आणि 45mm अशा दोन वेगवेगळ्या डिस्प्ले आकारामध्ये दोन प्रकार पडतात. या स्मार्टवॉचचा Actua डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटसोबतच किमान 1nits ते कमाल 2000nits ची तेजस्विता प्रदान करण्यास सक्षम आहे. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला मॉर्निंग ब्रीफ नावाचे एक नवीन वैशिष्ट्य देखील मिळणार आहे, जे वापरकर्त्याला त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजेच आरोग्य आणि फिटनेस मेट्रिक्स जसे की, झोपेची गुणवत्ता, तयारीचा वेळ, साप्ताहिक ध्येय प्रगती, हृदय गती परिवर्तनशीलता अशा बऱ्याच गोष्टींचा सारांश दर्शवण्याचे काम करते.

Pixel Watch 3 नवीन आणि सुधारित फिटनेस ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसोबत बनविण्यात आले आहे, जे तुमच्या धावण्याच्या दिनचर्येचे नियोजन, कार्यप्रदर्शन आणि प्रगती वर लक्ष ठेण्यासाठी मदत करेल या हेतूने डिझाइन केले आहे. हा स्मार्टवॉच सहा महिन्यांच्या Fitbit च्या मोफत प्रीमियम सोबत मिळतो. Pixel Watch 3 च्या 41mm प्रकाराची किंमत 39,900 रुपये आणि 45mm प्रकाराची किंमत 43,900 रुपये इतकी आहे. 

Pixel Buds Pro 2 ची किंमत आणि वैशिष्ट्ये

Pixel Buds Pro 2 हे Google च्या नवीन Tensor A1 चिपसोबत बनविण्यात आले आहेत, जे याच्या कामगिरी आणि बॅटरीचे आयुष्य वाढवण्याचे मुख्य काम करतात. या इअरबड्समध्ये 11 मिमी ड्रायव्हर्ससोबत हाय-फ्रिक्वेंसी चेंबर सुद्धा बसविण्यात आला आहे. सोबतच यामध्ये Google ने सायलेंट सील 2.0 सोबतच ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन सादर केले आहे, जे एक नवीन तंत्रज्ञान असून ते वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम आहे. यामध्ये ‘कन्व्हर्सेशन डिटेक्शन' देखील देण्यात आले आहे, जे AI चा वापर करून जेव्हा तुम्ही कोणासोबतही संभाषण सुरू करता, तेव्हा पारदर्शकता मोडवर स्विच करण्याचे काम करते. त्यानंतर काहीही न करता इअरबड्स स्वयंचलितपणे ANC मोडवर परत जातात. 

 Pixel Buds Pro 2 हे Find My Device नेटवर्कचे समर्थन करते, ज्यामुळे तुम्ही वापर करून ते हरवल्यास अचूकपणे शोधू घेऊ शकता. हे इअरबड्स एकदा चार्ज केल्यानंतर 8 तासांपर्यंत आणि केससह 30 तासांपर्यंत टिकू शकतात. Pixel Buds Pro 2 हे 22,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 हे दोन्ही गॅजेट्स तुम्ही फ्लिपकार्ट या वेबसाइटवर Croma आणि Reliance Digital सारख्या रिटेल स्टोअर्सवर 22 ऑगस्ट पासून खरेदी करू शकता.
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »